देवदर्शनाहून परतत असतानाच काळाचा घाला; भीषण अपघातात जालन्यातील तीन भाविक ठार

Parbhani Accident News: परभणी जिल्ह्यात भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर पाच भाविक जखमी असल्याची माहिती समोर येतेय. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2023, 09:30 AM IST
देवदर्शनाहून परतत असतानाच काळाचा घाला; भीषण अपघातात जालन्यातील तीन भाविक ठार title=
accident involving sugarcane tractor and cruiser 3 died on the spot

Parbhani Accident: परभणी जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येतेय. तर, पाच भाविक जखमी झाले आहेत. पाथरी तालुक्यातील वडी पाटीवरील मध्यरात्रीची ही घटना आहे. (Parbhani Accident Today)

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी पाटीवरील येथे मध्यरात्री दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि भाविकांच्या गाडीला समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती का भाविकांच्या कारचा पूर्ण चक्काचुर झाला आहे. यात तिघे जागीच ठार झाले आहेत तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सर्व भावीक हे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असून मानवत तालुक्यातील येशेवाडी येथे देव दर्शनासाठी आले होते. देव दर्शन करुन गावी परत जात असताना त्यांची कार उसाने भरलेल्या ट्रक्टरला धडकले. अपघात इतका जोरदार होता की या अपघातात दोन्ही वाहनांच्या मध्ये क्रूझर गाडी फसली होती, या गाडीला दोन जेसीबीच्या मदतीने बाजूला काढण्यात आले या विचित्र अपघातात तिघांना जीवाला मुकावे लागले तर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार

सिन्नर येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. असून विजय नामदेव मोरे (४२, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे. पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली. विजय मोरे हा बसस्थानकातून पायी बाहेर पडत होता. त्याचवेळी बसच्या पुढच्या मागील चाकाखाली तो सापडला असता ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बस थांबविली. मात्र डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.