अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला....

Amol Kolhe Shivaji Adhalrao Patil : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील समोर आले अन्.... तितक्यात चिमुकल्यानं केलेल्या वक्तव्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष

दिक्षा पाटील | Updated: Mar 28, 2024, 10:37 AM IST
अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला.... title=

Amol Kolhe Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडून शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असणार आहेत. या सगळ्यात ते शिवनेरी गडावर गेल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणाऱ्या डॉ.अमोल कोल्हे हे देखील त्याच ठिकाणी होते आणि महत्त्वाचं म्हणजे ते दोघे समोरा समोर आले. त्या दोघांनीही पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. पण समोरा समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना कशी प्रतिक्रिया दिली. त्यात सगळ्यांचे लक्ष हे तिथे आलेल्या एका मुलां वेधलं आहे. त्याची चर्चा सुरु आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

या समोर आलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील समोरा समोर आले. त्यावेळी त्या दोघांसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. तर शिवाजी आढळराव पाटील यांना पाहताच अमोल कोल्हे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या आरोग्याची विचारणा केली. तर दुसरीकडे त्यांचं बोलणं सुरु असताना शिवाडी आढळराव पाटील यांचा कार्यकर्ता असलेला एक लहाण मुलगा आला आणि तो अमोल कोल्हे यांना म्हणाला की "मला तुमची मालिका खूप आवडली." त्या लहाण मुलानं केलेल्या कौतुकावर अमोल कोल्हे हे हसले आणि "थॅंक्यू" म्हणाले. 

शिवाजी आढळराव पाटील यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना पक्षातून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश अजित पवार त्यांच्या उपस्थितीत पार पडला. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्याशिवाय त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. असं असताना आता ते शरद पवार यांच्या पक्षातील अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरुरमध्ये उभे राहणार. त्यामुळे दोन विपक्ष नेते हे समोर आल्यानंतर काय झालं त्या व्हिडीओची चर्चा सुरु झाली आहे. 

हेही वाचा : 16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'

डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायचे झाले तर  2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. तर त्याचवर्षी शिवसेनेकडून उभे राहिलेल्या उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हरवले. इतकंच नाही तर शिरुर लोकसभा मतदार संघाची खासदारही झाले. आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.