एन्रॉनच्या पायथ्याशी आव्हानातून संधी शोधणारं 'अंजनवेल'

एखाद्या गावच्या सरपंचाने ठरवलं तर काय होवू शकतं याचं उत्तम उदाहरण या गावात पाहायला मिळतंय... 

Updated: May 31, 2018, 07:19 AM IST

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : आता एक सुखवार्ता रत्नागिरीतल्या एका गावातून... इथल्या सरपंचांच्या एका चांगल्या कल्पनेमुळे गावातल्या अपंगांचं जगणं सुखकर झालंय. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातलं अंजनवेल गाव... सध्या हे गाव आदर्श गाव म्हणून नावारुपाला येतंय. अंजनवेल हे एन्रॉन प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेलं गाव... आव्हानांतून संधी कशी निर्माण करता येते, हे अंजनवेलनं दाखवून दिलंय. 

एखाद्या गावच्या सरपंचाने ठरवलं तर काय होवू शकतं याचं उत्तम उदाहरण या गावात पाहायला मिळतंय... अपंग कल्याण निधीतून या गावच्या सरपंचांनी अपंगांसाठी पेन्शन योजना सुरू केलीय. गावतल्या तब्बल ४० अपंगांना दरमहा एक हजार रूपये पेन्शन देणारी ही राज्यातली एकमेव ग्रामपंचायत...

गावाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य पद्धतीने नियोजनबद्ध आराखडा तयार केला तर चांगल्या योजना राबवता येऊ शकतात, हेच अंजनवेल ग्रामपंचायतीनं दाखवून दिलंय... विशेष म्हणजे अपंगांना ही पेन्शन योजना सुरू करण्यापूर्वी गावच्या मासिक सभेत निर्णय घेण्यात आला... गावानं संमती देत ही योजना गावात सुरू झालीसुद्धा... 

अंजनवेल ग्रामपंचायतीनं या अपंग पेन्शन योजनेसाठी बँकेत एक अकाउंटही उघडलाय... दर महिन्याला यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात... अंजनवेल गावाने अनेक योजना या गावात राबवल्या आहेत...