नक्षलविरोधी अभियान तीव्र, नक्षल स्मारक जमीनदोस्त

नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून भामरागड येथील नक्षल स्मारक जमीनदोस्त करण्यात आले आहे.

Updated: Jul 30, 2017, 12:00 AM IST
नक्षलविरोधी अभियान तीव्र, नक्षल स्मारक जमीनदोस्त  title=

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून भामरागड येथील नक्षल स्मारक जमीनदोस्त करण्यात आले आहे.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल्यांकडून साजरा करण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताहाला जनतेकडून ठिकठिकाणी प्रतिकार होताना दिसून येत आहे. 

नक्षल्यांविरोधात आता आदिवासी बांधव रस्त्यावर उतरल्याचेही चित्र आहे. याचबरोबर पोलीस जवानांचेही नक्षलविरोधी अभियान नक्षल सप्ताहा दरम्यान तीव्र करण्यात आले आहे. 

यामध्ये आज नक्षलविरोधी अभियाना दरम्यान भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी उभारण्यात आलेले नक्षल स्मारक जिल्हा पोलीस व सीआरपीएफ यांनी उध्दवस्त केले.

यामध्ये पोमके धोडराज हद्दीतील मौजा पेनगूंडा येथील नक्षल स्मारक व पोमके कोठी हद्दीतील तुमरकोडी- तोयनार येथील नक्षल स्मारक पोलीसांनी उध्दवस्त केले.