सुरेश खाडे यांची औकात काय आहे ?- राजू शेट्टींचा हल्लाबोल

विरोधकांना पालापाचोळा म्हणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांची औकात काय आहे ? असा हल्लाबोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

Updated: Oct 12, 2019, 11:04 PM IST
सुरेश खाडे यांची औकात काय आहे ?- राजू शेट्टींचा हल्लाबोल title=

मिरज : विरोधकांना पालापाचोळा म्हणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांची औकात काय आहे ? असा हल्लाबोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.  सत्तेचा माज असणाऱ्या भाजपा आमदारामध्ये दम असेल तर या मैदानात बघू,  आमच्या कार्यकर्त्यांच्यावर हद्दपारी केली तर तुडवू असे आव्हानही राजू शेट्टी यांनी दिले आहे. मिरजेतील स्वाभिमानीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी शेट्टी हे बोलत होते. स्वाभिमानीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांचा प्रचार शुभारंभ बेळंकी येथे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मठात करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत, काँग्रेस, राष्ट्रवादी मधील सर्व नेते आणि गट आले एकत्र आले आहेत. 20 वर्षात पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आले एकत्र आले असून कागदावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी प्रथमच प्रत्येक्षात एकत्र आली आहे. भाजपा उमेदवार सुरेश खाडे यांच्या 'विरोधी उमेदवार कचरा आणि पालापाचोळा' वक्तव्यानंतर विरोध सर्व नेते आक्रमक झाले आहेत.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आम्ही मिरजेतून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपच्या मंत्र्यांनी अधिकार्यांच्यावर दबाव आणून शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना जातीचा दाखल मिळू दिला नाही. म्हणून त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे मी आमदार म्हणून निवडून आल्यावर एक वर्ष आमदारकी सांभाळणार आहे. त्यानंतर महाराज आमदार बनवण्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. असे स्वाभिमानीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी सांगितलं.

तसेच आध्यत्मिक शक्ती ज्यांच्या पाठीशी असते, त्याला यश मिळते, स्वाभिमिनीचे उमेदवार हे विजयी होतील, असा दावा शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केला आहे.