महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया

निसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. 

वनिता कांबळे | Updated: May 19, 2024, 11:40 PM IST
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया title=

raireshwar fort sand : कधी पाहिलाय का जमिनीवरचा इंद्रधनुष्य ? महाराष्ट्रात निसर्गाची ही अद्भुत किमया पहायला मिळते. पुण्याजवळील रायरेश्वर पठारावर सात रंगांची माती पहायला मिळते.  स्वराज्याची शपथभूमी म्हणजे हा रायरेश्वर.  सह्याद्रीच्या शिखरांमध्ये विराजमान अशा रायरेश्वर पठाराला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. 4 हजार फूट उंच आणि 16 किलोमीटर लांब अशा या पठारावर निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.

हा चमत्कार पाहण्यासाठी पठारावरची ही लोखंडी शिडी चढून पुढे जावं लागतं. ज्या मंदिरात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, तेच हे शिवमंदिर इथून पुढे झाडाझुडपातून वाट काढत पुढे गेलं की निसर्गाचा हा अद्भुत ठेवा पाहायला मिळतो. सात रंगांची ही माती. मातीच्या सात रंगांचे ढीग एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. 

विशेष म्हणजे ही सात रंगांची माती एकाच खडकापासून तयार झालीय. वातावरण, पाऊस यामुळे त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून बदल होत गेला आणि ही सात रंगांची माती तयार झाली. लैटेराइट या खडकापासून पांढ-या,  पिवळ्या,जांभळ्या, काळ्या, लाल, राखाडी आणि हिरव्या रंगांची माती इथे पाहायला मिळते. सात रंगांच्या मातीचा हा अद्भुत खजिना रायरेश्वराच्या पठारावर लपलाय. गरज आहे ती असे समृद्ध खजिने शोधून ते जतन करण्याची  आणि पर्यटनाच्या दृष्टीनं अशी ठिकाणं विकसित करण्याची.

मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी सर केला रायरेश्वर  

पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभा मतदारसंघ येतो. या भोर विधानसभा मतदारसंघात रायरेश्वर पठारावर या दुर्गम मतदान केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावरचं मतदान केंद्र असून, इथल्या 160 मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भोरपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी, रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या मदतीनं या मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येतं. प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावं यासाठी कर्मचारी घेत असलेली ही  मेहेनत खरंच कौतुकास्पद आहे.