'मोदींवर टीका करणाऱ्यांचे पुतळे जाळा', मंत्र्यांकडून हिंसेचे धडे

मोदींवर टीका केली तर त्यांचे पुतळे जाळा, हे आम्ही नाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणत आहेत. ते परभणीत बोलत होते.

Updated: Sep 12, 2017, 09:07 AM IST
'मोदींवर टीका करणाऱ्यांचे पुतळे जाळा', मंत्र्यांकडून हिंसेचे धडे title=

परभणी : मोदींवर टीका केली तर त्यांचे पुतळे जाळा, हे आम्ही नाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणत आहेत. ते परभणीत बोलत होते.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली होती. त्यानंतर लोणीकरांनी राहुल गांधींची मिमिक्री करत त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली. 

राहुल गांधींचे पुतळे जाळायला हवेत, असं यावेळी लोणीकर म्हणाले. आपल्या नेत्यावर जर कुणी टीका करत असेल तर 'इट का जवाब पत्थरसे द्या' असं थेट आव्हानंच लोणीकरांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. 

टीका करणाऱ्य़ांचे पुतळे जाळा त्यांच्या सभा उधळून लावा, त्यांचा निषेध करा, त्याच्या बातम्या छापून आणा, असे धडे यावेळी लोणीकरांनी दिले.

असं बेजबाबदार विधान करत या मंत्रीमहोदयांनी कार्यकर्त्यांना त्यांनी थेट हिंसेचे धडेच दिलेत.