वडील, मुलीचा 'मातोश्री'त जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी हटकले

 हे दोघे बापलेक मुख्यमंत्र्यांकडे काहीतरी समस्या घेऊन आले होते.

Updated: Jan 5, 2020, 11:39 AM IST
वडील, मुलीचा 'मातोश्री'त जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी हटकले title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुळ निवास्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न वडील आणि मुलीने केला आहे. या दोघांना आत जाण्यापासून पोलिसांनी रोखले आहे. हे दोघेही ग्रामीण भागातून असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघे बापलेक मुख्यमंत्र्यांकडे काहीतरी समस्या घेऊन आले होते. पण त्यांचे नेमकं काम काय होतं हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

हातात फाईल आणि सोबत साधारण ७ ते ८ वर्षाची मुलगी असलेली व्यक्ती मातोश्रीच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी आपल्या येण्याची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना याबद्दल विचारले. पण आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्यावर ते ठाम होते. त्यानंतर पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. प्रसार माध्यमांचा देखील गराडा याकडे वळला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मातोश्री जवळील सुरक्षा यंत्रणेत वाढ झाली आहे. त्यांना भेटण्यासाठी मंत्रालयातही राज्यभरातून नागरिक येत असतात. आता या घटनेकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष देणार का ? हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.