नांदेडमधील किनवटच्या जंगलात अस्वल हल्ल्यात वृद्ध ठार

  किनवटच्या जंगलात हिंस्र झालेल्या अस्वलाने एका वृद्धाला ठार करुन अन्य एकावर हल्ला करुन गंभीर जखमी केलं.  

Updated: Aug 1, 2018, 10:27 PM IST
नांदेडमधील किनवटच्या जंगलात अस्वल हल्ल्यात वृद्ध ठार title=

नांदेड : जिल्ह्यातील किनवटच्या जंगलात हिंस्र झालेल्या अस्वलाने एका वृद्धाला ठार करुन त्याचं मुंडकं खाल्लं तर अन्य एकावर हल्ला करुन गंभीर जखमी केलं. घोगरवाडी जंगलात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या ५६ वर्षीय सुंगा मडावी यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या३५ वर्षीय व्यंकट मडावी हा देखील गंभीर जखमी झाला. 

रात्रीपासून अस्वलाचा शोध सुरु होता. तसेच गावकरी, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस अस्वलाचा शोध घेत होते. तेव्हा जंगलात वृध्दाचा मृतदेह आढळला. दरम्यान चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर अस्वलाला पकडण्यात यश आलं. गावकऱ्यांनीच अस्वलाला पकडले. यावेळी  देखील  त्याने गावकऱ्यांवर हल्ला केला.यात एक जण जखमी झाला.