Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Updated: Feb 21, 2022, 06:06 PM IST
Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी title=

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. 

QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, असं कुणीही सांगितलं तर ती फसवणूक असेल आणि तुम्ही स्कॅन करताच काही क्षणांत तुमचा अकाऊण्ट रिकामा होईल, असा इशारा स्टेट बँकेने दिला आहे.

गेल्या काही वर्षात ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. यात फसवुणीच्या सर्वाधिक घटना या मोबाईलच्या क्यूआर कोडवरुन झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयने आपल्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध केलं आहे. 

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना 

- QR कोड स्कॅन करुन पैसे मिळत नाहीत

- QR कोड पैसे ट्रान्सफरसाठी वापरा, पैसे मिळवायला नाही

- UPI पिन पैसे ट्रान्सफरसाठी वापरा, कोणालाही सांगू नका

- पैसे मिळणवण्यासाठी कधीही UPI पिन सांगावा लागत नाही

- पैसे ट्रान्सफर करण्याआधी UPI आयडीची खात्री करा

क्यूआर कोड म्हणजे काय?

स्मार्ट फोन आणि पैशांचा व्यवहार करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करत असाल, तर तुम्हाला  QR तंत्रज्ञानाची ओळख असेलच.  QR कोड म्हणजेच Quick Response Code. QR कोड हा एक प्रकारचा बार कोडच असतो, पण यात मेमरी क्षमता ही बारकोड पेक्षा अधिक आहे. म्हणूनच जगभरात QR कोडचा वापर केला जातो. बारकोड पेक्षा हा जलद आणि वेगवान आहे. आज विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड वापरले जात आहेत.