गिरीश महाजनांच्या गाडीवर दुचाकी आदळून अपघात

 वैद्यकीय कर्मचारी जखमी

Updated: Sep 28, 2020, 08:53 AM IST
गिरीश महाजनांच्या गाडीवर दुचाकी आदळून अपघात title=

जळगाव : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात झालाय. यामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला असून त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ ही घटना घडली. बी.सी. पवार असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहेत. दरम्यान दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

गिरीश महाजनांची गाडी लोहारी-वरखेडीतून जात असताना वैद्यकीय कर्मचारी आपल्या दुचाकीवरुन समोरुन येत होता. त्यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीस महाजनांच्या गाडीने धडक दिल्याची माहीती समोर येतेय. या अपघातात त्यांना गंभीर मार लागला असून अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. अपघातानंतर महाजन यांनी स्वत: जखमी पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.