मंदिर उघडण्यासाठी भाजपा आक्रमक, राज्यभर नेत्याचं आंदोलन

ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन केलं आहे.

Updated: Aug 30, 2021, 11:38 AM IST
मंदिर उघडण्यासाठी भाजपा आक्रमक, राज्यभर नेत्याचं आंदोलन  title=

मुंबई : मंदिर उघडावीत या मागणीसाठी भाजपा आता आक्रमक झाली आहेत. ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन केलं आहे. सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही,बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले मग मंदिर बंद का असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

बीडमध्ये भाजपचे आंदोलन 

मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंख नाद आंदोलन करत बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला आहे.  आज पासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासूनभक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील असा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत भाजपचे आंदोलन 

मुंबईत भाजप आमदार राम कदम यांनी सिद्धिविनायक मंदिराबाहेर आंदोलन केलं. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुण्यात भाजपचे आंदोलन 

मंदिरे सुरू केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय...! मंदिर उघडण्यासाठी आज पुण्याच्या मनाच्या पहिल्या कसबा गणपती समोर भाजपकडून आंदोलन करण्यात आले.. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

नागपूरात शंखनाद आंदोलन 

उद्धव ठाकरे यांचे सरकार असं का करतय, धर्मात आस्था ठेवणारे उद्धव ठाकरे कुणाच्या दबावात अधर्मी झाले आहेत हे कळत नसल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. येणाऱ्या सात दिवसात राज्य सरकारने मंदिर उघडली नाहीत तर भाजप कार्यकर्ते मंदिर खुली करतील असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. वाटल्यास सरकारने मंदिरांसाठी नियमावली करावी आणि त्याचे काटेकोरपणे पालन करून घेत मंदिर दर्शनासाठी खुले करावे.मात्र सर्वकाही खुलं करताना कोणाची भीती दाखवत फक्त मंदिर बंद ठेवण योग्य नाही...