या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.  भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Updated: Dec 4, 2022, 09:18 PM IST
या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात title=

गजानन देखमुख, झी मीडिया, हिंगोली : शिंदे गट(Shinde group) आणि भाजप(BJP) सत्तेत एकत्र आहेत. मात्र, निवडणुकांमुळे या दोन्ही गटात मतभेद होऊ शकतात अथवा वाद निर्माण होऊ शकतो असा प्रकारची घडामोड हिंगोलीत पहायला मिळाली आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.  भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आज भाजपा लोकसभा प्रवास योजना टप्पा 2 च्या निमित्ताने हिंगोली दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी वित्त मंत्री भागवत कराड यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदार संघातील बलस्थाने जाणून घेतली. 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपला जिंकायची असून सर्वांनी कामाला लागा असे आवाहन यावेळी कराड यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले.  त्यामुळे हेमंत पाटलाचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील आहेत.

राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत असल्याने खासदार हेमंत पाटीलच येथील लोकसभेचे उमेदवार असतील असे वाटत असतांना भाजप लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागला असून भाजपकडून तीन चार जण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. यामुळे हेमंत पाटलांच काय असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.