फी न भरल्यानं विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा देण्यास मनाई; मराठी, इंग्लिशचा पेपर बुडाला

आर्थिक अडचणींमुळे फी न भरू शकलेल्या विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू दिले नसल्याची संतापजनक घटना पंढरपूरात घडली आहे. 

Updated: Mar 21, 2022, 08:26 AM IST
फी न भरल्यानं विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा देण्यास मनाई; मराठी, इंग्लिशचा पेपर बुडाला title=

पंढरपूर  : आर्थिक अडचणींमुळे फी न भरू शकलेल्या विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू दिले नसल्याची संतापजनक घटना पंढरपूरात घडली आहे. पंढरपूरातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला घरगुती अडचणींमुळे विद्यार्थिनीला फी भरता आली नाही. त्यामुळे शाळेने विद्यार्थिनीला परीक्षेचं प्रवेशपत्रचं दिलं नाही.

पंढरपूर शहरातील एक विद्यार्थिनी फी न भरल्यानं दहावीच्या परीक्षेला बसू शकली नाही. या विद्यार्थिनीला मराठी, इंग्लिशचे पेपर देता आले नाही. घरगुती अडचणींमुळे या विद्यार्थिनीला शाळेची फी भरता आली नव्हती. 

शाळेनं परीक्षेसाठी लागणारं प्रवेशपत्र दिलं नाही. ही बाब इंग्लिश पेपरपूर्वी विद्यार्थिनीनं निर्भया पथकाला सांगितली. त्यांनी तिला शाळेत नेलं परंतु 15 मिनिटे उशीर झाल्याचं कर्मचा-यानं सांगितलं. 

निर्भया पथकाने ही बाब शिक्षण विभागच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर विद्यार्थिनीला पुढील पेपर देता येणार आहेत.