न्यायालयाच्या तोंडी शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी

 न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्याबद्दल मुुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत नाराजी व्यक्त केली. 

Updated: Jun 20, 2019, 07:50 PM IST
न्यायालयाच्या तोंडी शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पानसरे खून खटल्याप्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केली होती.  न्यायालयाच्या या वक्तव्याबद्दल मुुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत नाराजी व्यक्त केली. याबाबत मुुख्यमंत्र्यांना विधानसभेत सविस्तर स्पष्टीकरण देताना न्यायालयाच्या निकालाचे काही संदर्भही दिले. पानसरे खून खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत का ? अशी तोंडी टिपण्णी केली होती. त्यासंदर्भातील बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. 

लोकशाहीच्या तीनही स्तंभांनी आपल्या चौकटीत काम करावं आणि एकमेकांच्या अधिकारात अधिक्षेप करू नये अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली.

Image result for devendra fadnavis zee news

मी अपेक्षा व्यक्त करतो की घटनेनं जे तीन स्तंभ तयार केले आहेत. त्यांनी एकमेकांच्या अधिकाराचा सन्मान करावा. न्यायव्यवस्थेचा आम्ही सन्मान करतो. कारण आपल्या न्यायवय्वस्थेने एक लौकिक कमावलेला आहे, असं सांगत न्यायालयाच्या तोंडी शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे.