जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनड्युटी कर्मचाऱ्यांच्या डुलक्या, व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी ऑनड्युटी डुलक्या काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Updated: Apr 8, 2019, 04:15 PM IST
जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनड्युटी कर्मचाऱ्यांच्या डुलक्या, व्हिडिओ व्हायरल title=

नाशिक : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी ऑनड्युटी डुलक्या काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दत्तात्रेय देवराम ताजणे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. देवराम ऑफिसच्या वेळेत डुलक्या काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि झपाट्याने तो व्हायरल झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. आपापली कामं घेऊन आलेली सामान्य लोकं बाहेर ताटकाळात बसलेली असताना देवराम ताजणेसारखे कर्मचारी ऑफिसमध्ये चक्क डुलक्या काढतायत. आता जिल्हाधिकारी डुलक्या काढणाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल.