उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील, प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Jan 12, 2019, 09:44 PM IST
उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल title=

बीड : ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील, प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर गुट्टे हे बीड गंगाखेड साखर कारखान्याचे मालक आहेत. त्यांची पत्नी  सुदामती गुट्टे यांनीच परळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे, तसेच मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी धमकावणे, अशा तक्रारी सुदामती गुट्टे यांनी केल्यात. त्यानुसार परळी शहर पोलिसांनी रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कोण आहेत रत्नाकर गुट्टे ?

- बीडच्या परळी तालुक्यातील दैठणाघाटचे रहिवाशी
- परळीच्या थर्मल प्लांटवर मजूर ते कंत्राटदार असा प्रवास
- सुनील हायटेक प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून देशभरात वीज प्रकल्पाची कामे मिळवलीत
- शरद पवारांच्या हस्ते गंगाखेड साखर कारखान्याचा शुभारंभ केला
- मंत्री पंकजा मुंडे यांचे ते जवळचे म्हणून ओळखले जातात
- रासपच्या तिकिटावर २०१४ची विधानसभा निवडणूक लढवली
- गंगाखेड साखर कारखान्यांसाठी शेतकऱ्यांच्या नावाने अनेक बॅंकातून कोट्यवधींची कर्ज काढल्याचा आरोप

आधीचा व्हिडिओ । शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले