कल्याण-डोंबिवलीत कोरोना रूग्णांचा आकडा 10 हजारावर

कल्याण-डोंबिवलीत चिंता अधिकच वाढली आहे.

Updated: Jul 9, 2020, 09:09 AM IST
कल्याण-डोंबिवलीत कोरोना रूग्णांचा आकडा 10 हजारावर  title=

कल्याण : मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 12 वर पोहोचली आहे. तर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 9638 वर पोहोचली आहे. कल्याण-डोंबिवलीने नवी मुंबईला माग टाकलं आहे. कारण कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

बुधवारी कल्याण-डोंबिवलीत 24 तासांत 471 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दहा हजारावर पोहचल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

कल्याण-डोंबिवली कोरोनाचा विळखा वाढत असून बुधवारी कल्याणमध्ये 228, डोंबिवली 206, टिटवाळा-आंबिवली-पिसवली भागात 37 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 10 हजार 371 झाली आहे. सध्या येथे 5 हजार 247 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण 4 हजार 946 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतपर्यंत 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.