कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित

मुंबईसह राज्यात रविवारी, सोमवार लसीकरण स्थगित

Updated: Jan 17, 2021, 07:58 AM IST
कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित title=

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारी १६ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचा शुभारंभ (Corona Vaccine Suspended)  करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोविड लसीच्या मोहिमेचा शुभारंभ केला. रविवार आणि सोमवारी देखील कोरोना लसीचे वाटप होणार होते. मात्र कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, (technical issues in COWIN app) दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. 

२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेलं. नवीन वर्षात कोरोनाची लस आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच दिवशी अडचण आल्यामुळे हिरमोड झाला आहे. डिजिटल नोंदणीत व्यत्यय येत असल्यामुळे हे लसीकरण थांबवण्यात आले आहे.  मुंबईसह राज्यात रविवारी, सोमवार लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविन पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसारच लसीकरण सुरू राहणार, आरोग्य खात्याने जाहीर केलं आहे. कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले आहे 

कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ऍप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ आणि सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ऍप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

राज्यात नियोजित लसीकरण सत्र रद्द केलेले नाही, असा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे. राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दि. १८ जानेवारी पर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्ता संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले  कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात  आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.