सेल्फी काढण्याच्या नादात घडली डहाणू बोट दुर्घटना

डहाणूत शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी शोधमोहीम संपुष्टात आलीये. सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय.

Updated: Jan 14, 2018, 01:16 PM IST
 सेल्फी काढण्याच्या नादात घडली डहाणू बोट दुर्घटना  title=

डहाणू : डहाणूत शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी शोधमोहीम संपुष्टात आलीये. सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय.

 बोटीत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनीच याला दुजोरा दिलाय.. सेल्फी काढण्याच्या नादात सर्व विद्यार्थी बोटीच्या एका बाजूला गेले त्यामुळे बोट उलटली आणि ३० विद्यार्थी समुद्रात फेकले गेले. 

मच्छिमारांच सहकार्य 

 यातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर इतरांना वाचवण्यात यश आलंय.. या मदत कार्यात स्थानिक मच्छिमारांनी मोठ सहकार्य केलं.

दोघांना अटक 

 या प्रकरणी बोटीचा मालक महेंद्र अभिरे याच्यासह पार्थ आंबिरे आणि धीरज आंबिरे यांना अटक करण्यात आली.