पहिला श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी

आज पहिला श्रावण सोमवार असल्यानं राज्यभरातल्या ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहाटेच्या पूजेपासूनच मोठ्या प्रमाणात पूजापाठांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Jul 24, 2017, 09:57 AM IST
पहिला श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी title=

मुंबई : आज पहिला श्रावण सोमवार असल्यानं राज्यभरातल्या ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहाटेच्या पूजेपासूनच मोठ्या प्रमाणात पूजापाठांचं आयोजन करण्यात आलं आहे.

भाविकही मोठ्या संख्येनं या पूजाअर्चनेसाठी मंदिरात दाखल होत आहेत. तिकडे  12 वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा भविकानी दर्शनासाठी गर्दी केली आहे. 12 व्या ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले तर सर्व ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशी आख्यायिका आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी घृष्णेश्वराच्या मंदिरात मोठी गर्दी असते. पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक  दोन अडीच तास रांगेत उभे राहून भाविक त्रम्बक राजाच दर्शन घेत आहेत.