रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातला छोटा नीरव मोदी - धनंंजय मुंडे

गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे.

Updated: Jul 17, 2018, 06:23 PM IST
 रत्नाकर  गुट्टे हा महाराष्ट्रातला छोटा नीरव मोदी - धनंंजय मुंडे  title=

नागपूर : गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे. रत्नाकर  गुट्टे हा महाराष्ट्रातला छोटा नीरव मोदी असून त्यानं शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करूनही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. 

या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी मुंडेंनी केली. ही मागणी विधानपरिषद सभापतींनी फेटाळून लावली. मात्र या गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयानं एसआयटी  नेमली नसेल तर शासनानं 6-7 महिन्यांत एसआयटी नेमून कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.