आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर : राज्यभर प्लास्टिकबंदी लागू झालीये.. मात्र चंद्रपुरात विघटन होणारं प्लास्टिकबाजारात आलंय.. बंगळुरुच्या बायोग्रीन टेक्नॉलॉजीनं विघटनशील प्लास्टीक तयार केल्याचा दावा केलाय.. ही कंपनी ३ दिवसांत संपूर्ण राज्यात हे प्लास्टिक उपब्ध करुन देणार आहे.. पाहुयात या प्लास्टिकची वैशिष्ट्ये. बंगळुरूच्या बायोग्रीन टेक्नॉलॉजी कंपनीनं प्लास्टिकला पर्याय शोधल्याचा दावा केलाय.. या कंपनीनं पर्यावरण पुरक प्लास्टिक तयार केलंय.. हे प्लास्टिक भाज्यांचे स्टार्च-वृक्षांचे तेल- कृषी टाकाऊ पदार्थ यापासून तयार होणार आहे. याचे आयुष्य केवळ १ वर्षाचं असेल.
ही कंपनी केवळ कॅरीबॅगच नव्हे तर प्लेट्स, स्पून्स , वाट्या, ग्लासची निर्मिती करते. बायोग्रीन टेक्नॉलॉजीच्या वस्तू नैसर्गिकरित्या विघटन होणा-या आहेत. याबाबत केंद्र आणि राज्य सरकाराच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना देखील आहे. या वस्तू जाळल्यावर मागे केवळ राख उरते जी माती सामान आहे तर रासायनिक चाचणीतही या वस्तूत मागे कुठलाही घातक अंश शिल्लक राहत नसल्याचा कंपनीचा दावा आहे.
सध्या चेन्नई आणि बंगळुरू येथे कंपनीने आपले उत्पादन युनिट सुरु केले आहेत. आता ही कंपनी मुंबईतही उत्पादन सुरु करणार आहे.. येत्या ३ दिवसात राज्यात हे प्लास्टिक उपलब्ध करून देणार आहे... सध्याच्या प्लास्टिक वस्तूंपेक्षा हे पर्यावरणपूरक प्लास्टिक तिप्पट महाग असलं तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन वाढल्यास याचे दर कमी होऊ शकणार आहेत. असं झाल्यास प्लास्टिकटची सवय झालेल्या नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे.