कौतुकास्पद: गुरूजींचा अटकेपार झेंडा....

शिक्षकाचा अटकेपार झेंडा 

Updated: Jan 4, 2020, 08:17 AM IST
कौतुकास्पद: गुरूजींचा अटकेपार झेंडा....  title=

मयुर निकम , झी मीडिया , बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असलेले  सहाय्यक शिक्षक डॉ शिवाजी देशमुख यांची  यांची अत्यंत महत्वपूर्ण अश्या फुलब्राईट फेलोशिप अमेरिकेसाठी निवड झाली आहे. 

डॉ. शिवाजी देशमुख ०७ जानेवारी ते १४ मे २०२० पर्यंत 'इंडीयाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनेसिल्व्हीयाना,अमेरिका'  येथे शैक्षणिक संशोधन करणार असून विविध शाळा भेटी व सेमिनारमध्ये अमेरिकेन शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे उद्बोधन तसेच विविध शहरांमध्ये 'भारतीय सांस्कृतिक राजदूत' म्हणtन अमेरिकेन समुदायासोबत संवाद साधणार आहे.

यूसिएफ (USIEF)  United States Indian Education Foundation, अमेरिका व भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने कृषी, प्रशासन,पर्यावरण, संशोधन व शिक्षण या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 'फुलब्राईट फेलोशिप' आणि 'फुलब्राईट स्कॉलर'चा दर्जा दिला जातो.  या वर्षी भारतीय शिक्षण क्षेत्रातील ५ व्यक्तींना फुलब्राईट फेलोशिप मिळाली आहे त्यांपैकी महाराष्ट्र व स्थानिक स्वराज्य संस्थेतील डॉ. शिवाजी देशमुख एकमेव फुलब्राईट स्कॉलर आहेत.

 बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर शिवाजी देशमुख यांची फुलब्राईट फेलोशिप अमेरिकासाठी निवड झाली आहे. देशातून एकुण पाच आणि त्यापैकी महाराष्ट्रातून डॉक्टर देशमुख यांची या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. यामुळे शिक्षकांच सर्वच स्तरावरून याचं कौतुक होत आहे. ़डॉक्टर देशमुख सध्या बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. फुलब्राईट फेलोशिप अंतर्गत ७ जानेवारी ते १४ मे या काळात इंडीयाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनेसिल्व्हीयाना अमेरिका येथे शैक्षणिक विषयावर संशोधन करणार आहेत.