राष्ट्रपती भवन ते परतीच्या प्रवास.. असा असेल ट्रम्प यांचा आजचा कार्यक्रम

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा 

Updated: Feb 25, 2020, 08:40 AM IST
राष्ट्रपती भवन ते परतीच्या प्रवास.. असा असेल ट्रम्प यांचा आजचा कार्यक्रम title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार असून अनेक करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील.

ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जारेड कुश्नर देखील भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प आणि त्यांचा परिवार ३६ तासांचा प्रवास केल्यानंतर सोमवारी अहमदाबाद येथे पोहोचला. कालच्या भव्य स्वागत सोहळ्यानंतर आज देखील विशेष कार्यक्रम नियोजीत आहेत. 

सकाळी 10 वाजता - राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाला उपस्थित राहणार

सकाळी 10.30 वाजता - राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करणार 

सकाळी 11 वाजता -  हैदराबाद हाऊसला भेट देणार. पंतप्रधान मोदींसोबत प्रतिनिधी मंडळाची बैठक. दुपारी पंतप्रधान मोदींसोबत लंच

दुपारी 12.40 वाजता - संयुक्त पत्रकार परिषद. यानंतर ते अमेरिकी दूतावासाला भेट देतील.

संध्याकाळी 7.30 वाजताः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. कोविंद-ट्रम्प यांच्यात डिनर भेटचे आयोजन

रात्री १० वाजता - अमेरिकेला जाण्यासाठी जर्मनीमार्गे ते रवाना होतील