एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना मोठा दणका ईडीने दिला आहे.  

Updated: Jul 7, 2021, 10:29 AM IST
एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक title=

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना मोठा दणका ईडीने दिला आहे. ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जमीन घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली आहे.  भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यात आली आहे. नागपुरात झोटिंग समितीने ही चौकशी केली आहे. भोसरीमधल्या जमीन गैरव्यवहाराचे खडसे यांच्यावरही आरोप आहेत. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Deal Case) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. त्यांना काल सकाळी ईडी कार्यालयात बोलविण्यात आले आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हा एकनाथ खडसे यांना हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे. या जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचीही चौकशी झाली होती. आपण याप्रकणात निर्दोष आहोत, असे स्पष्टीकरण खडसे यांनी याआधी दिले आहे.  

भोसरी जमीन प्रकरणाबाबत झोटिंग समितीने तपास केला आहे. तसेच एसीबीने खडेसे यांना क्लीनचिट दिली आहे. दरम्यान, एकीकडे खडसे यांना क्लीनचिट तर दुसरीकडे ही जमीन सरकारचीच असल्याचेही एसीबीने म्हटले होते. दरम्यान, (Bhosari MIDC land ) घोटाळ्याप्रकरणी  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) याआधी समन्स बजावले होते. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसे यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य केले.

जमीन व्यवहार (Bhosari MIDC land purchase) या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.

काय आहे भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण?

 - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचे प्रकरण
- सर्व्हे क्रमांक 52 मधील 3 एकर जागा
- ही जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केली
- स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले
- या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली
- ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता
- खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाल्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते
- या आरोपांनंतर खडसेंनी 4 जून 2016 रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला