निलेश खरे, झी मिडिया, शिर्डी : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची . जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता (Maharashtra Politics). सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(NCP leader Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत(Latest Political Update).
सुषमा अंधारे प्रक्षोभक भाषण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा परंतु कोणत्याही नेत्याला अशा प्रकारे भाषण करायला बंदी घालणे म्हणजे अघोषित आणीबाणी असण्यासारखे असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला. शिंदे फडणवीस सरकार अंधारे यांना घाबरत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मागे शेकडो पोलीस तैनात करुन एका ठिकाणी आणून ठेवले. दुसरीकडे अंधारे यांना सभा घ्यायला बंदी घालत बंदीस्त सभागृहात सुद्धा सभा घेण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. अशा बंदिस्त सभागृहात सभा घ्यायला बंदी करता येत नाही. एखादी संस्था यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये.
सुषमा अंधारे यांचा धसका या सरकारने घेतलेला दिसतोय. यामुळेच पोलीस बंदोबस्त वाढवून भाषणाला बंदी करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांची जळगावातील सभा रद्द झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये सुषमा अंधारे थांबल्या होत्या तेथे मोठा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. नजरकैदेपेक्षा भयानक स्थिती असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यामुळे हा वाद आणखी पेटणार आहे.
सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषणातून शिंदे गट तसेच भाजप नेत्यांवर सातत्याने टीकेची झोड उडवत आहेत. वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, सातत्याने त्या सभा घेत आहेत रॅली काढत आहे.