फास्ट न्यूज, २५ एप्रिल २०१७, ४.३० संध्याकाळी

व्हिडीओवर थोडक्यात मिळतील सर्व बातम्या एका क्लिकवर 

Updated: Apr 25, 2018, 05:53 PM IST

1. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अध्यात्मिक गुरू आसारामला जन्मठेप... अन्य दोन दोषींना 20 वर्ष कारावास... दोघं निर्दोष... निकालानंतर आसारामला कोसळलं रडू... 

2. महाराष्ट्राची स्थिती बिहारपेक्षाही वाईट... सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांचा फडणवीसांना टोला.... सरकार निष्क्रीय असल्याचा साक्षात्कार... 

3. नाराज भाजपा आमदार आशिष देशमुखांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट... तेलशुद्धिकरण प्रकल्प नाणारहून विदर्भात हलवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार...

4. यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनं... ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा... प्रक्रियेत पारदर्शकता आल्यानं बदल्यांमधल्या गैरप्रकाराला बसणार आळा... 

5. स्वस्त घरांची अपेक्षा पूर्ण करणाऱ्या मुंबईच्या विकास आराखड्याला मंजुरी... तर आराखडा बिल्डरांच्या फायद्यासाठी असल्याची संजय निरुपम यांची टीका...

6. राज्यातल्या आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर... यवतमाळ, जळगाव आणि वाशिममध्ये दुष्काळ, तर मराठवाड्यातून यंदा दुष्काळ हद्दपार...

7. देशभरात वाढलेलं साखरेचं उत्पादन उद्योगाच्याच मुळावर... साखरेचे दर कोसळल्यामुळे ऊसाला FRPनुसार दर देणं अवघड... शेतकऱ्यांचे 3200 कोटी रुपये कारखान्यांकडे थकित... 

8. जमीनमालकांसाठी आनंदची बातमी... एक मेपासून ऑनलाईन सातबारा उता-यावर तलाठ्याच्या सही शिक्क्याची गरज संपली... ऑनलाईन उतारा ग्राह्य धरला जाणार...

आणि

9. शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश निमसे हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा... पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याचं उघड... पत्नीसह दोघांना अटक... तिघे फरार...