ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना विपरीत घडले; कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. 

Updated: Sep 9, 2023, 10:26 PM IST
ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना विपरीत घडले; कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात   title=

Accident Kolhapur Ratnagiri Highway : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना एका कारला हा अपघात झाला आहे.  या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

 शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कार, रिक्षा आणि दोन दुचाकी यांची एकमेकांना धडक होऊन अपघात झला. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल असून नऊ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच जखमेच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. 

अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील बिडगर कुटुंब हे जोतिबाचे दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. ज्योतिबाचे दर्शन घेऊन ते कारमधून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना आंबेवाडी येथे असलेल्या रेडेडोहजवळ सुंदर बिडगर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पन्हाळ्याच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

या धडकेत रिक्षा उलटून रस्त्यावरून खाली पडली. धडक झाल्यानंतर कार पुढे जाऊन दोन दुचाकींना उडवत बाजूला जाऊन उलटली. या अपघातात दुचाकीवरील पंकज जाधव याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कार, रिक्षा आणि दोन्ही दुचाकींवरील 11 जण जखमी झाले.

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एस टर्न ला दोन अपघात, 11 जण जखमी

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याच्या येथे एस टर्न ला दोन अपघात झाले आहेत. या अपघातात 6 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून 11 जण या अपघातात जखमी झाले आहेत.या एस टर्न ला आत्ता पर्यंत अनेक अपघात झाले असून आज एका ट्रॅक आणि बलेरो चा या वळणावर अपघात झाला त्यात 8 जण जखमी झाले त्यानंतर त्याच ठिकाणी एक कंटेनर, दोन कार आणि एका जीपचा काही वेळाने दुसरा अपघात झाला त्यात 3 जण जखमी झाले आहेत.

समुद्र किनारी वाळूमध्ये अडकला डंपर

उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी उभा असलेला डंपर वाळूमध्ये अडकला होता. वाळूमध्ये रुतलेला हा डंपर जेसीबीच्या सहाय्याने तब्बत एक तासाच्या मेहनतीनंतर काढण्यात आला. समुद्राचे पाणी वाढू लागल्याने डंपर समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती यावेळी निर्माण झाली होती. मात्र वेळीच जेसीबीची मदत घेतल्याने डंपरला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.