गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव

सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे. 

Updated: Nov 2, 2022, 11:54 AM IST
गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव title=

हेमंत चौपडे, झी मीडिया, जुन्नर: हल्ली शहरात बिबटे शिरण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. अनेक भागात खासकरून शहरी भागात बिबट्यांचे (Leopard VIDEO) प्रमाण वाढते आहे. मुंबई परिसरातही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तेव्हा अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी त्या त्या परिसरात वनविभाग (Forest department) तातडीनं प्रयत्नशील असतं. सध्या असाच एक प्रकार महाराष्ट्रातील जुन्नर या भागात आलेला पाहायला मिळाला आहे. या भागात अचानक एक बिबट्या शिरला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपिट झाली. यामुळे रहिवाश्यांना अनेक त्रासही सहन करावा लागला. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी वनविभागानं यावर तातडीनं कार्यवाही केली. 

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (Narayan Gaon) परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून कोल्हेमळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर, माणसांवर हल्ले (Leopard Attack) केले होते त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे होते. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाला यश आलंय.

हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

या बिबट्या अनेकांना शारिरिक हानी पोहचवली होती. त्यामुळे सध्या सगळीकडेच त्याच्याविषयी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. अखेर या बिबट्याला जेरबंद (Leopard in Custody) करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. 

अनेकदा बिबट्या हा शहरात शिरतो तेव्हा तो फक्त काही भागातच फिरत नाही तर कधी घरात, स्वयंपाकघरात, सोसायटीमध्ये, कॉलनीत अशा प्रकारे अनेक ठिकाणी बिबट्यानं धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला आहे.