क्रीडा साहित्याचा वापर करून साकारला बाप्पा

दिव्यांग असलेले अकोल्यातले प्रसिद्ध कलाकार टिल्लू टावरी यांनी श्रींची मूर्ती साकारली आहे. 

Updated: Aug 31, 2017, 10:42 AM IST
क्रीडा साहित्याचा वापर करून साकारला बाप्पा title=

अकोला : विघ्नहर्त्या गणरायाला त्याचे भक्त विविध रुपांमध्ये पाहत असतात. अकोल्यातल्या वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळानं गणेशाचं असंच आगळंवेगळं रूप साकारलं आहे. यासाठी या मंडळानं चक्क खेळाच्या साहित्याचाच आधार घेतलाय. दिव्यांग असलेले अकोल्यातले प्रसिद्ध कलाकार टिल्लू टावरी यांनी श्रींची मूर्ती साकारली आहे. 

गेल्या ४७ वर्षांपासून या मंडळानं वाळू, केळी, कापूस, रुद्राक्ष, भांडी, गुलाब या आणि इतर वस्तूंपासून गणपती बाप्पा साकारुन आपलं वेगळेपण जपलं आहे. २९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्राडी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधत टिल्लू टावरी यांनी, हॉकी, क्रिकेट, फूटबॉल, टेबलटेनिस, या आणि इतर खेळांत वापरल्या जाणा-या साहित्यांचा उपयोग करुन ही मूर्ती साकारली आहे. 

या गणपती मंडळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम मिळून या गणपतीची स्थापना करतात. हा आगळावेगळा गणपती पाहण्यासाठी अकोलेकरांची रोजच गर्दी होत आहे.