मुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video

ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे

Updated: Nov 2, 2022, 04:38 PM IST
मुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video title=

प्रफुल्ला पवार, झी मीडिया, नागोठणे: हल्ली आपल्या महामार्गांवरही (Traffice Today in National Highway) अनेक प्रकारचे प्राणी संचार करताना पाहायला मिळतात. कधी मध्येच गाडीच्या पुढे येतात. तर कधी गाडीतही घुसतात. तुम्हाला माहिती असेलच की नॅट जिओ सारख्या चॅनेलवरून आपणही कायमच प्राण्यांचे असे व्हिडीओ (Animal Videos) पाहत असतो. तर कधी प्राण्यांचे अनेक व्हिडीओ (Viral Video) हे व्हायरलही होतं असतात. नुकताच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात एक रानगवा सरळ मुंबई - गोवा महामार्गावर पाहायला मिळाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतो आहे. (gaur spotted near mumbai - goa highway video goes viral mumbai police)

ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना (Police) ते महामार्गानजिक पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा रानगवा पाहायला मिळाला त्यांनी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये या रानगव्याचे चित्रिकरण केलं आहे. 

हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

रायगड जिल्ह्यात रानगव्याचे दर्शन झालंय. नागोठणे (Nagothane) नाजिक सुकेळी खिंडीत मुंबई गोवा महामार्गा लगत रानगवा आढळून आला. तेथे पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन मेंगाळ यांनी मोबाईल कॅमेऱ्यात त्याला चित्रित केला. हा रानगवा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वाहनांची वर्दळ असल्याने त्याचा प्रयत्न फसला. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना सावध केले. यापूर्वी पोलादपूरच्या जंगल भागात रानगवा आढळला होता, असे सांगितले जाते. दरम्यान नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन वनविभागाने केलं आहे.