धुळ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

 मुंबईतील महिला महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Sep 16, 2017, 12:13 AM IST
धुळ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक title=

मुंबई  : मुंबईतील महिला महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  धुळे शहरातील हा प्रकार आहे. याप्रकरणी एकाच कुंटूबातील ५ जणांविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धुळे शहरातील सागर अनिल सुर्यवंशी आणि अनिल वामन सुर्यवंशी यांनी रिंकु संजय पाटील या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले. मुंबई येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयात नोकरी देतो असे सांगून तिच्याकडून ३ लाख रुपये घेतले. यानंतर बनावट नियुक्तीपत्र देवून त्यांनी रिंकूची फसवणूक केली. 

हा प्रकार लक्षात आल्यावर रिंकू आणि तिचे कुंटुबीय सुर्यंवशी यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी गेले. यावेळी सुर्यवंशी कुटुंबीयांनी त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  याप्रकरणी सागर अनिल सुर्यवंशी, अनिल वामन सुर्यवंशी, सरला अनिल सुर्यवंशी, अनुराधा अनिल सुर्यवंशी आणि श्‍वेता अनिल सुर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.