शिर्डीला समृद्धी, वंदे भारतनंतर आणखी एक भेट, साईभक्तांसाठी दोन महिन्यात तिसरी आनंदाची बातमी

साईबाबांच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात, या साईभक्तांसाठी आणखी एक आंदाची बातमी आली आहे

Updated: Feb 16, 2023, 05:25 PM IST
शिर्डीला समृद्धी, वंदे भारतनंतर आणखी एक भेट, साईभक्तांसाठी दोन महिन्यात तिसरी आनंदाची बातमी title=

Shirdi : शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी (Sai Bhakta) आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धा महामार्ग (Nagpur to Shirdi Samruddhi Mahamarg) खुला झाल्यानंतर मुंबई ते शिर्डी वंदे भारत (Mumbai-Shirdi Vande Bharat) सुरु झाली. आता शिर्डित विमानांच्या नाईट लँडिंगची (Night Landing) सुविधाहीप प्राप्त झाली आहे. त्यामुळे भाविकांसाठी (Devotee) गेल्या दोन महिन्यातील तिसरी आनंदाची बातमी आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचे आभार मानले आहेत. 

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी
विमानांच्या नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना साईभक्तांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही काळापासून प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज सकाळी डीजीसीएकडून (DGCA) हा परवाना प्राप्त झाला.

शिर्डी प्रवास सुलभ होणार
नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे शिर्डी प्रवास तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचं उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च-एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत.