'जाहिरातींवर खर्च होतो पण कर्जमाफी नाही'

राज्यातील भाजप सरकार हे जुमले का सरकार आहे. 

Updated: Oct 31, 2017, 05:18 PM IST
'जाहिरातींवर खर्च होतो पण कर्जमाफी नाही' title=

पुणे : राज्यातील भाजप सरकार हे जुमले का सरकार आहे. त्यांचा फक्त जाहिरातबाजीवर खर्च सुरु आहे. विकासकामं असो कर्जमाफी , हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. फडणवीस सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्शवभूमीवर सुप्रिया यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.

पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील समस्यांच्या पार्शवभूमीवर सुप्रिया यांनी आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. या गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच झालेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी समिती नेमण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.