Gram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर

Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.   

Updated: Dec 20, 2022, 01:26 PM IST
 Gram Panchayat Election :  हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर  title=
Gram Panchayat Election Result 2022 NCP Dhananjay Munde BJP Pankaja Munde High Voltage Parli who wins nmp

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत (Gram Panchayat Election Result 2022) रणधुमाळी पाहिला मिळतं आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदार संघाकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. कारण इथे राजकारणातील कट्टर विरोध बहिण भावाची कसोटी पाहिला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यामध्ये हा संघर्ष आहे. या दोघांमध्ये एकदम काँटे की टक्कर दिसून येतं आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत (2019 Assembly Elections) धनंजय मुंडे यांनी आपली बहिण पंकजा मुंडे यांच्या पराभव केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत  कोणाला कौल मिळाला हे ते पाहूयात. 

भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर 

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात त्यासाठी मोठी विजय उत्सव करण्याची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आलं आहे. तसंच डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत. मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूकमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचं प्राथमिक फेरीत दिसून येत आहे. (Gram Panchayat Election Result 2022 NCP Dhananjay Munde BJP Pankaja Munde High Voltage Parli who wins)

धनंजय आणि पंकजताईंचा चुलत भाऊ विजयी

दुसरीकडे नाथरा ग्रामपंचायतबद्दल (Nathara Gram Panchayat) बोलायचं झालं तर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं जन्मगाव असलेल्या नाथरामध्ये पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि धनजंय आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे (Abhay Munde win) विजयी झाले आहेत. 

''आमचं पहिलेच ठरलं होतं''   

नाथरा ग्रामपंचायचा निकाल हाती आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दावा केला आहे की, ''आमचं पहिलेच ठरलं होत की, त्यांचा सरपंच आमचा उपसरपंच असेल''

अशी झाली संघर्षाला सुरुवात 

एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ हे राजकीय आखाड्यात परस्परांचे कट्टक विरोधक...त्यामुळे निवडणुकीत या लढतीकडे राज्याचं विशेष लक्ष असतं. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे असतानाच या दोघा भाव बहिणीमध्ये संघर्षाला सुरूवात झाली. 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. बस्स हेच कारण या दोघा बहिण भावाला दूर करण्यास पूरेस ठरलं. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच पुढे हा संघर्ष आज अख्खा जगाला दिसला.