शेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद

मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत.

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 08:23 PM IST
शेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद title=

नाशिक : मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत. बाजार समितीत शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल हमालांकडून दमदाटी करुन काढून घेतला जातो. त्याला विरोध करणा-या शेतक-याला बाहेरच्या गुंडाकरवी दमदाटी करण्यात येते. विजय दौलत पवार यांनी मालेगाव बाजार समितीमध्ये टरबूज विक्रीसाठी आणले होते. त्यावेळी हमालांनी दमदाटी करुन टरबूज त्यांच्याकडून काढून घेतले. त्यास विरोध करणा-या या शेतकऱ्याला हमालाने शिवीगाळ करत मारहाण केली.

शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण

दरम्यान, मालेगाव बाजार समितीमध्ये हमालांकडून शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाणीचे प्रकार नित्याचेच झालेत. यावर बाजार समितीचे कोणतंही नियंत्रण नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.