कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश; रोकड मोजण्यासाठी पोलिसांना मागवावी लागली मशीन

Nagpur latest news | Nagpur hawala racket |  नागपुरातील कुंभरपु-यात पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. कोट्यवधींचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

Updated: Mar 5, 2022, 08:25 AM IST
कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश; रोकड मोजण्यासाठी पोलिसांना मागवावी लागली मशीन title=

नागपूर : नागपुरातील कुंभरपु-यात पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. कोट्यवधींचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून हवालाचे 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करत तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलंय. 

देशात हवाला रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. नागपूरमध्ये कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत महाल परिसरात इंद्रायणी साडी सेंटरच्या मागे कुंभरपु-यात एका घरी छापा टाकत ही कारवाई केली. 

रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आणि छाप्यात सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना मशीन मागवावी लागली.  या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झालीय.