आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती - राजेश टोपे

भरती प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार आहे.   

Updated: Jan 17, 2021, 08:51 PM IST
आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती - राजेश टोपे title=

कळंब :  कोरोना काळात राज्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. कळंब येथील एका खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राजेश टोपे बोलत होते. डॉक्टर, नर्सेस, टेकनेशीयन, वॉर्ड बॉय, अशा 56 केडररसाठी एकूण 17 हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरचं पार पडणार आहे.

त्यापैकी 50 टक्के जागांसाठी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय येत्या दोन दिवसात संबंधी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व पदांसाठी परीक्षेच्या आधारावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत.

ही भरती प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या करारावर केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची थेट नेमणूक केली जाऊ शकत नाही. मात्र आशा कर्मचाऱ्यांना परीक्षेत प्रतिवर्षाचे 3 गुण अधिकचे दिले जाणार असल्याची माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी दिली.