Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 15, 2023, 08:27 AM IST
Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?  title=
Heat Wave in Maharashtra

Heat Wave in Maharashtra : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा (Heat Wave in Maharashtra) उकाडा प्रचंड वाढला आहे. राज्यातील तापमानाची विक्रमी वाढ होत असताना हवामान खात्याने (Meteorological Department) उष्णतेची लाट येण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी पुन्हा 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव आणि सोलापूरमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने 5 वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याची घटना ताजीच असताना राज्यात उष्माघाताने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अवकाळीसोबतच वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा ज्यामुळे त्रास कमी होऊ शकतो असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील 36 पैकी 26 जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांत सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमानासह उष्णतेच्या लाटेचा (heat wave) सामना करत आहे.

वाचा: मोठी बातमी! BMC सह महापालिका निवडणुका 2024?

शहरातील तापमानाची नोंद 

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अहमदनगर (40.0C), सातारा (40.4C), बुलढाणा (40.6C), पुणे (40.8C), वाशिम, बीड आणि लातूर (41.0C), उस्मानाबाद (41.0C), सोलापूर आणि औरंगाबाद (41.4C), चंद्रपूर (41.6C), जालना, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर (प्रत्येकी 42.0C), अमरावती (42.6C), नांदेड (42.8C), परभणी, गोंदिया , भंडारा आणि धुळे (43.0C), वर्धा (43.4C), परभणी (43.6C), अकोला (44.5C), जळगाव (44.9C) तापमानाची नोंद झाली आहे. तर सिंधुदुर्ग (33.0C), मुंबई शहर (34.4C), रत्नागिरी (35.0C), मुंबई उपनगर (35.2C), कोल्हापूर (35.6C), ठाणे (36.0C), पालघर (36.7C), रायगड (37.0C), नंदुरबार (38.0C), सांगली (38.1C), नाशिक (39.7C) मध्ये तापमानाची नोंद करण्यात आली आहे.   

उष्णतेच्या लाटेचा इशारा

आयएमडीने संपूर्ण किनारी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह विविध भागांमध्ये उष्णतेची लाट जाहीर केली आहे. किनारपट्टीवरील कोकणासाठी या मोसमातील उष्णतेच्या चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

उष्णतेत अशी घ्या काळजी

उन्हाळ्यामुळे होणारे आजार आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला तर बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी 11 ते 4 या वेळेत उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने त्यावेळस बाहेर फिरणे टाळा. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स सोबत ठेवा. जेणेकरून तुम्हाला ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो. तसेच डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर टोपीचा जास्त वापर करा.