शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील चंदनापुरी घाटातील तामकडा धबधबाही वाहु लागलाय.

Updated: Jun 22, 2018, 07:27 AM IST
शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात मान्सुन चांगलाच सक्रीय झालेला दिसुन येतोय काल दुसऱ्या दिवशी शिर्डी सह उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळ पासुन पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शिर्डीतील जोरदार पावसा मुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली.. संगमनेर तालुक्यातली पठार भागातही संध्याकाळ पासुन जोरदार पाऊस कोसळतोय. या जोरदार पावसामुळे  नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील चंदनापुरी घाटातील तामकडा धबधबाही वाहु लागलाय.

कोकणात इशारा 

कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. येत्या २४ तासांत  कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय...पावसाचा हा जोर राज्यभर दिसेल तर 25 जूनला कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे... 23 ते 25 जून या कालावधीत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज ही हवामान विभागाने वर्तवला आहे.