तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

यंदाही शिक्षण मंडळाने हा पायंडा कायम राखला आहे.

Updated: Oct 5, 2018, 06:07 PM IST
तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर title=

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान पार पडेल. 

लवकरच www.mahahscsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तारखांप्रमाणे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. 

पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मंडळाकडून ऑक्टोबरमध्येच संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. यंदाही शिक्षण मंडळाने हा पायंडा कायम राखला आहे.