गोपीनाथ मुंडेंप्रमाणे मी किंगमेकर होणार - पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते त्याचप्रमाणे मी देखील, पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन.

Updated: Oct 18, 2018, 08:00 PM IST
गोपीनाथ मुंडेंप्रमाणे मी किंगमेकर होणार - पंकजा मुंडे  title=

बीड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेत गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे मी राज्यात किंगमेकर होणार, असा दावा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. दरम्यान, जे सगळे सर्व्हे केले आहेत ते सर्व खोटे आहे. पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास पंकजा यांनी यावेळी व्यक्त केला. 

सावरगाव येथे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडाची घोषणा केली. यापुढे दरवर्षी यश ठिकाणी या आणि शक्तीचे दर्शन घ्या, असे म्हणत पंकजा यांनी विरोधक आपल्यावर जी टीका करतात ती खोटी आहे. मला गर्दी जमवण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यावे लागत नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान बाबांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री महादेव जानकर, मंत्री राम शिंदे यांच्यासह आमदार, खासदार, संत महंत उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे आणि इतर आमदार खासदार यांच्याबद्दल झालेला सर्व्हे खोटा आहे. सर्व्हे करणाऱ्यांनी इथं येऊन बघावे, असे थेट आव्हान दिले. दरम्यान, स्व. गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते त्याचप्रमाणे मी देखील. कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवत नाही, असे म्हणत त्यांनी त्यांच्याबाबत नेहमी होणाऱ्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

ऊसतोड कामगार माझी वोट बँक आहे, अशी टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी ऊसतोड कामगार हे माझं फिक्स डिपॉझिट आहे. बँक आहे. त्यांच्या जीवावर माझं राजकारण सुरु आहे. त्यांच्यासाठी 100 कोटींचा निधी देण्याचे यावेळी आश्वासन दिले.