Corona | कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागणार? काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) शिथिल केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागलीय.  

Updated: Sep 4, 2021, 10:22 PM IST
Corona | कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागणार? काय म्हणाले विजय वडेट्टीवार? title=

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) नियंत्रणात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. मात्र यानंतर आता मुंबईत कोरोनाने (Mumbai Corona) पुन्हा डोकं वर काढतंय. मुंबईतल्या प्रतिबंधित इमारतींची संख्या दुप्पट झालीये.  त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय. यामुळे मुंबईत पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे, असं इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिला आहे. (If people do not avoid crowds corona restrictions will have to be imposed again maharashtra warns Minister Vijay Vadettiwar)

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या 

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. शहरात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने दररोज 400 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. सोबतच प्रतिबंधित इमारतींची संख्या आणि प्रतिबंधित मजल्यांची संख्याही दुप्पटीने वाढलीय.  मुंबईत 18 ऑगस्टला 24 इमारती प्रतिबंधित होत्या.  तो आकडा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 48 वर पोहचला आहे. तसेच विविध ठिकाणच्या इमारतींमधील 1200 हून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

ऑगस्टमध्ये 200 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णांची संख्या आता 400 च्या पुढे गेलीय. लालबाग, परळ, भायखळा, दादर-माहीम, कुलाबा, वांद्रे, खार पश्चिम, वडाळा, नायगाव या भागांत वेगानं रुग्णवाढ होतीय. 

मंत्री विजय वडेट्टीवार काय म्हणाले? 

कोरोनाची तिसरी लाट आली, ती आता येण्याची शक्यता आता वाढलीय. केरळातही वाढलीय सोबतच महाराष्ट्रातही वाढली आहे. अशा स्थितीत या तिसऱ्या लाटेला टाळण्यासाठी गर्दी टाळणं हाच उपाय आहे, अन्यथा पुन्हा निर्बंधाना सामोरं जावं लागेल, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. 

कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागलीय. तसच सणासुदीचे दिवस असल्यामुळे खरेदीसाठी लोक बाहेर पडू लागलेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक जण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करताना दिसत नाहीत. पहिल्या आणि दुस-या लाटेतूनही लोकांनी धडा घेतलेला दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिली तर कोरोनाची तिसरी लाट आणि लॉकडाऊन अटळ आहे.