चिपळूण हादरले! दहावीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन तासानंतर आली शुद्धीवर

चिपळुण मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. 

Updated: Dec 17, 2023, 07:52 PM IST
चिपळूण हादरले! दहावीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन तासानंतर आली शुद्धीवर  title=

Chiplun Crime News : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. अत्याचारानंतर ही मुलगी तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ बेशुद्ध अवस्थेत होती. शुद्धीत आल्यानंतर तिने पोलिस पालकांच्या मदतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी मुलीवर झालेल्या या अत्याचारामुळे चिपळूण हादरले आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नेमकं काय घडलं? 

चिपळूण मधल्या कोकरे गावात मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.  दहावी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अधिक तपास सावर्डा पोलीस करत आहेत. दहावी शिकणाऱ्या या मुलीचा नंबर संगमेश्वर तालुक्यातील एका मुलाला मिळाला होता. यानंतर हा मुलगा  पीडित मुलीला कॉल करून त्रास देऊ लागला. काही दिवसानंतर हा मुलगा मुंबईतून थेट चिपळूण येथे आला मुलीला कॉल करून भेटायला बोलावले.

जबरदस्तीने बाईकवर बसून आपल्या मित्राच्या घरी

भेटायला आल्यानंतर या मुलाने पीडित मुलीला जबरदस्तीने बाईकवर बसून आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेला. याच ठिकाणी त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडून त्याच ठिकाणी राहिली. अडीच तासाच्या नंतर मुलगी शुद्धीवर आल्यानंतर मुलीने आपलं घर गाठलं आणि सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर तातडीने वडिलांनी सावर्डा पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सावर्डा पोलिसांनी देखील तातडीने पहिल्यांदा एका आरोपीला अटक केली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या संबंधित पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या दोन्ही आरोपी हे सावर्डा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले.  दोन्ही आरोपींना चिपळूण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.