पंढरपूर पोटनिवडणूक: भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज रद्द करा, अपक्ष उमेदवाराची कोर्टात धाव

अपक्ष उमेदवारांची मागणी

Updated: Apr 1, 2021, 10:06 PM IST
पंढरपूर पोटनिवडणूक: भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज रद्द करा, अपक्ष उमेदवाराची कोर्टात धाव title=

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी अपक्ष उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अपक्ष उमेदवार माउली हळणवर यांनी थेट उच्च न्यायालयात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.  

भाजप उमेदवार समाधान आवताडे हे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

या दोन्ही साखर कारखान्यांनी एफ आर पी रक्कम थकवली आहे. साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी अपक्ष उमेदवार माउली हळणवर यांनी केली आहे.