टीम इंडियाचा पराभव करत वेस्ट इंडीजची मालिकेत बरोबरी

वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडीयाचा पराभव

Updated: Dec 8, 2019, 11:42 PM IST
टीम इंडियाचा पराभव करत वेस्ट इंडीजची मालिकेत बरोबरी  title=

नवी दिल्ली : तिरुवनंतपुरममध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडीयाने उभा केलेला १७० धावांचा डोंगर वेस्ट इंडीजने ८ गडी राखून पार केला.पहिल्या पाच ओव्हरनंतर फॉर्मात आलेल्या इवाल लुइसने १० ओव्हरमध्ये ४० रन्स केले. त्यानंतर सिमंसने ६७ रन्सची तुफान खेळी करत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. विराट कोहलीने हेटमायरची खूप सुंदर अशी कॅच पकडली पण तो काही मॅच तारु शकला नाही.

सिरीजमध्ये बरोबरी 

पंधराव्या ओव्हरमध्ये सिमंसने पूरनसोबत चहुबाजूला शॉट्स खेळले. १८.३ ओव्हरमध्ये ८ विकेट राखून शानदार विजय मिळवला. आता वेस्ट इंडीजने सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. निकोलस पूरनने ३८ आणि सिमंसने नाबाद ६७ रन्स बनवले. टीम इंडीयाच्या वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाने एक-एक विकेट घेतला.