भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पहिला 'भगवान महावीर अहिंसा पुरस्कार'

भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पहिला भगवान महावीर अहिंसा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

Updated: Mar 3, 2019, 06:48 PM IST
भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पहिला 'भगवान महावीर अहिंसा पुरस्कार' title=

नाशिक : भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पहिला भगवान महावीर अहिंसा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. अखिल भारतीय दिगंबर जैन महासमिती द्वारे सुरू करण्यात आलेल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले व्यक्ति आहेत. संघटनेच्या  एका आधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची एफ १६ विमाने पिटाळून लावली. त्याचवेळी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. शूक्रवारी रात्री भारतीय वैमानिक भारतात दाखल झाले. 

संघटनेच्या महाराष्ट्र युनिटचे संयोजक पार लोहाडे यांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष मनिंदर जैन यांनी नवी दिल्लीतील लष्करी विमानाचे पायलट यांना हा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराखाली भारतीय वैमानिक अभिनंदन 2.51 लाख रुपयांचा रोख रक्क्म देण्यात येणार असून स्मृती चिन्ह आणि स्मरणपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. 17 एप्रिल रोजी महावीर जयंतीच्या प्रसंगी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना या पुरस्कारे गौरविण्यात येणार आहे.