विमानाने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

Airlines News :  मुंबईतील विमानाने तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी... 

Updated: Oct 31, 2022, 11:12 AM IST
विमानाने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!  title=

Mumbai News :  पूर्वी विमानाने प्रवास करणे ही खूप मोठी गोष्ट होती. परंतु आता अनेकांना विमानाने प्रवास करणे सामान्य झाले आहे. तरीही भारतासारख्या देशात अशी अनेक कुटुंबे आणि लोक आहेत, जे विमान प्रवासाला स्वप्न समजतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक विमानात प्रवास करण्याचे स्वप्न पाहतात. जर तुम्हीपण विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.  

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) तुम्ही आज प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण संभाजीनगरच्या नागरिकांना आता विमानाने मुंबईला (mumbai airport) जायचं असेल तर पहाटे लवकर उठूनच तयारी करावी लागेल. कारण आजपासून (31 ऑक्टोबर) इंडिगोचं मुंबई साठीचे संध्याकाळचे विमान बंद ठेवण्यात येणार आहे.  

वाचा : 'या' शहरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी!   

मुंबईतून उड्डाण होणार विमान सकाळी करण्यात आलाय. त्यामुळे इंडिगो आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्यांची मुंबईसाठीचे विमान आता सकाळीच असणार आहे. संध्याकाळच्या विमानसेवेपेक्षा सकाळच्या विमान सेवेला जास्त रिस्पॉन्स असल्याचा कंपनीने सांगितले मात्र यामुळे एक दिवसात विमानाने मुंबईत जाऊन परत येण आता संभाजीनगर वासीयांना शक्य नाही.