जत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं.

Updated: Dec 10, 2017, 10:47 PM IST
जत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. संध्याकाळपर्यंत 68 टक्केहुन अधिक मतदान झालं आहे. 20 नगरसेवक पदाच्या जागेसाठी 76 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी प्रमुख लढत ही काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवार विरोधात भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका अरळी यांच्यातच आहे.

भाजपा आणि काँग्रेस मध्ये अत्यंत काटयाची टक्कर आहे. जत नगरपरिषदेसाठी प्रमुख लढत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जत नगरपरिषदेत मागच्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे स्वबळावर लढत असल्याने चुरशीची निवडणूक झाली आहे.